Breaking Posts

5/trending/recent

Type Here to Get Search Results !

इंदापूर तालुक्यातील पी एस आय होण्याचा बहुमान मिळविलेले बहुतांश मुले ही जिल्हा परिषदेच्या शाळेचे विद्यार्थी






प्रतिनिधी

 इंदापूर  ता.11  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून इंदापूर तालुक्यातील 6 विद्यार्थ्यांनी पोलीस उपनिरीक्षक होण्याचा बहुमान मिळविला आहे. यातील पाच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरवात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतुन मराठीमधून झाली.


स्पर्धा परीक्षेच्या यशाचे गमक जिल्हा परिषदेच्या शाळाच ठरल्या आहेत. तावशीमधील करिष्मा वणवे हिचे पहिली ते चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले असून, पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण गावातीलच इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमिक विद्यालयात झाले.खोरोची येथील अजयसिंह भाळे याचे पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले असून,पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण निरवांगीमधील पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालयामध्ये झाले. पळसदेवच्या अभिजित दत्तात्रेय ढेरे याचे प्राथमिक व माध्‍यमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये व पळसनाथ विद्यालयामध्ये झाले.निरवांगीमधील रणधीर रोकडे यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये; तर माध्यमिक शिक्षण गावातीलच माध्यमिक विद्यालयामध्ये झाले.काटीच्या ज्योती शिंदे हिचे पहिली ते चौथीचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या व माध्यमिक काटेश्‍वर विद्यालयामध्ये झाले. तर, अक्षय शिंदे याचे शिक्षण वालचंदनगरमधील इंग्रजी माध्यमाच्या भारत चिल्ड्रेन्स अकॅडमी मध्ये झाले.

स्पर्धा परीक्षेच्या यशाचा मार्ग निश्‍चितच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमधून जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.



👁️ Post Views : 1,120

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad