Breaking Posts

5/trending/recent

Type Here to Get Search Results !

बारामतीत अवैध गुटख्यावर मोठी कारवाई, 30 लाखाचा मुद्देमाल जप्त ; लासुर्णेतील संशयित आरोपी प्रशांत गांधी यास अटक,बारामतीसह इंदापूर तालुक्यातील गुटखा तस्करांचे धाबे दणाणले !

प्रतिनिधी,

बारामती :-  बारामती तालुक्यातील सुपे भागातील मौजे उंडवडी गावच्या हद्दीत विद्युत सबस्टेशन जवळील फार्म हाऊसमध्ये रविवारी (दि. 24 मार्च) रोजी पहाटे 3.15 च्या सुमारास अवैध गुटखा साठ्यावर मोठी कारवाई करण्यात आली. सदर पोलीस कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत तब्बल 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईत प्रशांत गांधी (वय 48 वर्षे, रा. लासुर्णे ता. इंदापूर जि. पुणे. सध्या रा. ऋषिकेश अपार्टमेंट, पेन्सील चौक बारामती) या 
 संशयित आरोपीला भा. द. वि कलम 328, 188 तसेच अन्नसुरक्षा आणि मानदे कायदा 2006 मधील कलम 26 (2) (प) सहवाचा कलम 3 (1) (ZZ) (V) शिक्षा कलम 59 तसेच कलम 26 (2) (4) सहवाचा अन्न सुरक्षा आयुक्त यांचे दि. 18 जुलै 2013 चे आदेश, कलम 27 (3) (डी) शिक्षा कलम 27 (3) (इ) शिक्षा कलम 59 नुसार अटक करण्यात आली. तसेच या कारवाईत निसार (पुर्ण नाव माहित नाही) (रा. विजापुर, कर्नाटक) आणि राहुल मलबारी (रा. यवत ता. दौंड जि. पुणे) यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, बारामती तालुक्यातील मौजे उंडवडी सुपे गावच्या हद्दीत संशयित आरोपी प्रशांत गांधी याचे विद्युत सबस्टेशन जवळील फार्म हाऊसमध्ये त्याचेकडे असलेल्या वाहन नंबर एम. एच 12 के. पी 9674 याने वाहतुक करून तब्बल 20 लाख रुपये किंमतीचा अवैध गुटखा महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षा आयुक्त यांचे प्रतिबंधीत आदेश क्रमांक असुका/181/21/07/ असुक अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य दिनांक 12/02/2021 नुसार महाराष्ट्र राज्यात गुटखा पान मसाला घटीत होवुन  शकेल असा पदार्थ सुगंधी स्वादीष्ट सुपारी आदीचे उत्पादन/साठा / वितरण/वाहतुक तसेच विक्री यावर बंदी असताना, सदर गुटखा हा मानवी आरोग्यास अपायकारक प्रतिबंधीत पदार्थ असल्याची जाणीव असताना तसेच सदर  20 लाख रुपये किंमतीचा पान मसाला गुटखा पदार्थ स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता विक्री वाहतूक व साठा करीत असताना मिळून आला.
सदर कारवाई ही पोलीस ग्रामीण अधीक्षक पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुग्गड , बारामती उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके यांच्या टीमकडून करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेंडगे करीत आहेत.

गुटखा विक्री प्रकरणी 3 वेळेस कारवाई झाल्यास दुकानदारावर आता थेट मोक्का 
गुटखा बंदीसाठी शासनाची भूमिका कडक आहे. शाळा परिसरात ५०० मीटरवर असणाऱ्या गुटखा विक्रेत्यांवर कारवाईसाठी समितीची स्थापना करण्यात येणार आहे. अवैध गुटखा विक्रीप्रकरणी तीनदा कारवाई झाल्यास संबंधित विक्रेत्यावर थेट मोक्का अंतर्गत कारवाईची घोषणा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केली होती. मात्र आता पर्यंत पोलिसांकडून असे अवैध गुटखा विक्री करणाऱ्या तस्करांवर किंवा दुकांदारांवर अद्याप पर्यंत कारवाई होताना दिसत नाही. या कारवाया कधी होणार ? याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.


👁️ Post Views : 8,110

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad