Breaking Posts

5/trending/recent

Type Here to Get Search Results !

आणि विद्यार्थ्यांनी प‌क्ष्यांसाठी केली चारा पाण्याची व्यवस्था.....

प्रतिनिधी,

लासुर्णे :- गतवर्षी पाऊस खूपच कमी झाल्याने सर्वांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे .माणसांचे पाण्यासाठी हाल होत असताना पक्ष्यांची अवस्था तर खूप वाईट झाली आहे. परंतु अशा परिस्थितीत पाटीलवस्ती (लासुर्णे) ता. इंदापूर जि. पुणे या शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक श्री दिलीपराव काळे शिक्षिका मंदाकिनी लोंढे, गीतांजली लाड, अर्चना कुंभार, पल्लवी गवळी, मनीषा लोंढे, राजश्री सुतार व शीतल लोंढे या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या परिसरात पक्ष्यांसाठी विद्यार्थ्यांनी चारा व धान्याची सोय केली आहे. घरगुती टाकाऊ वस्तूंपासून पक्ष्यांना पाणी व चारा ठेवण्यासाठी त्यांनी शालेय परिसरात व्यवस्था केली आहे. शाळेतील झाडांवर पाण्याच्या बाटल्या त्यांना आकार देऊन बांधल्या आहेत. दररोज त्यामध्ये पाणी व चारा ते ठेवत आहेत. त्यामुळे शालेय परिसरात आता पक्ष्यांची संख्या वाढली असून विद्यार्थ्यांनी त्यांना खऱ्या अर्थाने जीवदान दिले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी घराच्या परिसरात देखील पक्ष्यांसाठी चारा व पाणी़ ठेवण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थाने भावनिक विकास झाला आहे असेच म्हणावे लागेल.

तसे पाहता अगोदरच निसर्गात, गावात व परिसरात पूर्वीपेक्षा पक्ष्यांची संख्या खूपच कमी झालेली आहे आणि आता तर परिसरात पिण्यासाठी पक्ष्यांना पाणीही कोठे दिसत नाही, त्यामुळे पक्ष्यांचे अतोनात हाल होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत पाटीलवस्ती शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांनी केलेले कार्य अनन्यसाधारण तसेच कौतुकास्पद आहे.

पाटीलवस्ती शाळेत दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे अवांतर उपक्रम सतत राबविले जातात. दर्जेदार ,गुणवत्तापूर्ण शिक्षण व स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्नदायी वातावरणासाठी ही शाळा प्रसिद्ध आहेच. त्यामुळे या शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होते. इंग्रजी तसेच खाजगी शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर या शाळेत दाखल झाले आहेत.ं

 शाळेतील या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थी सर्वांच्या कौतुकास पात्र ठरत आहेत.



👁️ Post Views : 1,130


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad