Breaking Posts

5/trending/recent

Type Here to Get Search Results !

इंदापूरच्या महिला पैलवानांनी गाजवले महिला महाराष्ट्र केसरीचे मैदान


प्रतिनिधी 

इंदापूर :- विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त १०, ११ आणि १२ डिसेंबर २०२३ रोजी २५ वी वरिष्ठ महिला तसेच ६ वी सब ज्युनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तसेच २ री महिला महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचे आयोजन चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे करण्यात आले होते.ह्या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून जवळपास ६०० महिला कुस्तीगीरांनी या स्पर्धेसाठी भाग घेतला होता. या भव्यदिव्य स्पर्धेचे आयोजन ब्रम्हपुरी शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगणात करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये इंदापूर तालुक्यातील महिला कुस्तीपटू शिवानी प्रदिप करणे हिने सुवर्ण पदक, अनुष्का दत्तात्रय यादव हिने सुवर्ण पदक, सोनाली दसरथ शिंदे हिने कास्य पदक पटकावत यश संपादन केले.

रविवार दि.17 डिसेंबर रोजी या सर्व खेळाडू व त्यांचे कोच आमदार दत्तामामा भरणे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी सरपंच अमोल (पप्पू शेठ) तोरवे, श्री. हामा पाटील व  ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.


👁️ Post Views : 5,170

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad