Breaking Posts

5/trending/recent

Type Here to Get Search Results !

आठदारे येथील शेतीमहामंडळ कामगारांची घरे पाडण्याकरिता लवाजम्यासह झालेला प्रयत्न कामगार कुटुंबांनी हाणून पाडला.



प्रतिनिधी


जंक्शन :-  गाव मौजे लासुर्णे हद्दीतील आठदारे ( ता. इंदापूर ) येथे.शेती महामंडळ कामगारांच्या वास्तव्यासाठी 70 वर्षांपूर्वी म्हणजेच 1947 साली शेती महामंडळ मालकीच्या एन ए जागेत कॉलनी (चाळ्या) बांधण्यात आल्या आहेत.

 या चाळींमध्ये बहुसंख्य अनुसूचित जातीचे कामगार रहिवाशी वास्तव्य करीत असून,चाळीच्या अवतीभवती महामंडळाच्या मालकीच्या असणाऱ्या बकळ जागेमध्ये कच्ची -पक्के घरे बांधून हे कामगार आपला उदरनिर्वाह करत आहेत.

शेती महामंडळ बंद झाल्यापासून हे कामगार अतिशय हलाखीचे जीवन जगत आहेत. अशातच शेती महामंडळ अधिकारी, कर्मचारी,प्रशासकीय महसुली अधिकारी कर्मचारी व बांधकारी शेतकरी यांच्या संगनमताने या कामगारांची घरे शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये येत आहेत. असे दाखवून ती पाडण्यासाठी काल दि.(7 जुलै ) 2023 रोजी प्रशासनाच्या लवाजम्यासह प्रयत्न करण्यात आले. अनेक शेतक-यांनी महामंडळाची कित्येक एकर जमिन अतीक्रमण करुन बळकावली आहे. त्यांच्या वरती कोणीही कारवाई करीत नाहीत. मात्र ज्या कामगारांनी शेती महामंडळासाठी घाम गाळला त्यांची घरे पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत हे दुःखद आहे.असा येथील महामंडळाच्या कामगारांमध्ये संताप आहे.


कामगारांनी त्यांची घरे वाचविण्याच्या भुमिकेमुळे हा प्रयत्न फसला आहे. जरी ही घरे पाडण्यात आली तर दहा ते पंधरा कुटुंब हे बेघर होणार आहेत. म्हणून हे कामगार चिंतीत झाले आहेत.

 जर आमची घरे पाडण्याचा पुन्हा प्रयत्न केला गेला तर आम्ही सामूहिक आत्मदहन करू असा इशारा देखील येथील कामगारांनी दिला आहे.

त्याचबरोबर या कामगारांची घरे पाडण्याचा प्रयत्न करणा-या संबंधित भ्रष्ट,दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवरती चौकशी करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत.





👁️ Post Views : 2,780

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad