Breaking Posts

5/trending/recent

Type Here to Get Search Results !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लासुर्णे येथे उत्साह ; डीजेच्या विद्युत रोषणाईच्या भव्य मिरवणुकीत अनुयायांची गर्दी

प्रतिनिधी,

लासुर्णे :- महामानव, राज्य घटनेचे शिल्पकार,विश्वरत्न,घटनातज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, राजकीय नेते, समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी एप्रिल महिन्यात देशभरासह विदेशातही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावेळी लासुर्णे ता. इंदापूर जि. पुणे येथे बुधवारी 24 एप्रिल 2024 रोजी अनुयायांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेबांची 133 वी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी लासुर्णे आयोजित देशाची सद्यस्थिती आणि संविधानाबद्दल युवकांमध्ये जागृती आणण्यासाठी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळच्या वेळी निल ध्वजाचे ध्वजारोहन व संविधान पठण करण्यात आले. तसेच बुधवारी दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सायंकाळी डीजे, विद्युत रोषणाई व भीमसैनिकांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य  मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारो भीम अनुयायांनी या मिरवणुकीला उपस्थिती दर्शविली होती.

व्हिडीओ 👇👇

लासुर्णे येथे सालाबाद प्रमाणे डॉ. आंबेडकरांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी होत असते. या निमित्ताने काही दिवस आधीच शहरातील व गावातील पाहुणे मंडळी जयंतीसाठी लासुर्णे या गावी आपल्या नातेवाईकांच्या घरी हजेरी लावत असतात. यंदाही ही परंपरा कायम होती.वर्षभर आम्ही पुस्तके वाचत असतोच चैत्यभूमी, दीक्षाभूमी, भीमाकोरेगाव, महाड, आणि विविध ठिकाणच्या अश्या  अनेक स्थळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील व त्यांनी स्वतः लिहिलेल्या पुस्तकांसह इतरही महत्वपूर्ण अनेक  पुस्तकांची उलाढाल करोडोच्या रुपयात होत असते पण एक दिवस बापाच्या जयंतीला नाचलो तर बिघडले कुठे असेही यावेळी येथील उपस्थित अनुयायांनी इंदापूर चौफेर न्यूजशी प्रतिक्रिया देताना सांगितले.

लासुर्णे गावात उत्साहात निघालेल्या मिरवणुकीत डीजेच्या तालावर महिलांसह पुरुष, लहानगे व जेष्ठ मंडळी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकप्रिय गाण्यांवर थिरकत होते. या मिरवणुकीत मोठा जल्लोष पहायला मिळाला यावेळी मिरवणुकीत विद्युत रोषणाई आकर्षित करत होती. यात पुरुषांसोबत महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता.यामुळे येथील मुख्य रस्ते भिम अनुयायांच्या गर्दीने फुलून गेले होते.

मिरवणुकीनंतर लासुर्णेच्या नाग नालंदा बुद्धविहार याठिकाणी सुर नवा ध्यास नवा फेम चेतन लोखंडे व सहकारी यांचा सुमधुर भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.

लासुर्णे येथील जयंतीच्या पार्श्वभूमीवर वालचंदनगर पोलिसांनी देखील पुरेपूर काळजी घेतली होती. जयंतीस गालबोट लागू नये याकरिता वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्ताचे चोख आणि उत्तम नियोजन करण्यात आले होते.


👁️ Post Views : 6,890

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad