Breaking Posts

5/trending/recent

Type Here to Get Search Results !

वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निवडणुकीमध्ये अॅक्शन मोडवर ; रेकॉर्डवरील गुन्हेगार दिपक पांडुरंग भोसले याच्यावर एम. पी. डी. आय अंर्तगत कारवाई करुन केले स्थानबध्द



प्रतिनिधी,

वालचंदनगर :- वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये व इंदापुर तालुक्यामध्ये वारंवार गुन्हे करुन दहशत माजवणारा आरोपी नामे दिपक पांडूरंग भोसले रा. शेळगांव, ता. इंदापुर, जि. पुणे याने गेल्या काही वर्षापासुन इंदापुर तालुक्यामध्ये वारंवार गुन्हे करुन दहशत निर्माण केली होती. आता पर्यंत त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशन येथे चोरी, खुनाचा प्रयत्न, मारामारी, खंडणी तसेच इतर प्रकारचे गुन्हे दाखल होते. गुन्हे दाखल होवुन सुध्दा वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करत होता. त्याला आळा घालण्यासाठी मा. पंकज देशमुख साो, पोलीस अधिक्षक यांचे सुचनेनुसार व मा. अपर पोलीस अधिक्षक संजय जाधव, बारामती विभाग, व मा. डॉ. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. विक्रम साळुंखे यांनी दिपक भोसले याला स्थानबध्द करण्याबा प्रस्ताव तयार करुन मा. पोलीस अधिक्षक सो, कार्यालय पुणे ग्रामीण याठिकाणी सादर केला होता. त्यानंतर सदर प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे पुढील आदेशकामी सादर करण्यात आला होता. त्यानंतर मा. जिल्हाधिकारी सो, पुणे यांनी दिनांक १५/०४/२०२४ रोजी सदर आरोपी नामे दिपक पांडुरंग भोसले यांस एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्याचे आदेश निर्गमीत केले होते. सदरचा आदेश प्राप्त झालेनंतर वरिष्ठांच्या सुचनेनुसार वालचंदनगर पोलीस स्टेशन कडील पो. हवा स्वामी, पोहवा काटकर, पोना चांदणे, पो.शि कळसकर यांनी तात्काळ दिपक भोसले यांस ताब्यात घेवुन वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे पुढील कार्यवाहीसाठी हजर केले. त्यानंतर त्यास एक वर्षाकरीता मा. जिल्हाधिकारी

सो यांच्या आदेशान्वये येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे याठिकाणी स्थानबध्द करण्यात आले आहे. तरी येणाऱ्या काळात वालचंदनगर पोलीस स्टेशनकडुन निवडणुक काळामध्ये शांतता राखण्याचे आव्हान वालचंदनगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी विक्रम साळुंखे, सहा. पोलीस निरीक्षक यांनी केलेले आहे.

सदरची कारवाई ही मा. पंकज देशमुख साो, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण यांचे सुचनेनुसार व मा. संजय जाधव, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग, व मा. डॉ. सुदर्शन राठोड, उपविभागीय प्रोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी विक्रम साळुंखे, तसेच पोलीस उप-निरीक्षक मिलींद मिठापल्ली, पोलीस उप-निरीक्षक कसपटे, पोलीस हवालदार शैलेश स्वामी, पोलीस हवालदार, गणेश काटकर, पोलीस हवालदार,विकास निर्मळ, पोलीस नाईक चांदणे, पोलीस नाईक थोरात, पोलीस अंमलदार  अभिजीत कळसकर व पोलीस अंमलदार खुळे यांनी केली.



👁️ Post Views : 4,110

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad