Breaking Posts

5/trending/recent

Type Here to Get Search Results !

इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात बरसल्या पावसाच्या सरी ; नागरिकांना उकाड्यापासून दिलासा

 



प्रतिनिधी

वालचंदनगर :- रणरणत्या उन्हापासून हैराण झालेल्या इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागात आज बुधवार दि.17 एप्रिल 2024 रोजी सायंकाळच्या वेळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने काही प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून अंगाची लाहीलाही होत असलेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला.

इंदापूर तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह सायंकाळच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. तापमानात मोठी वाढ झाल्याने नागरिक उकाड्याने हैराण होऊन गेले होते. त्यामुळे अवकाळी पावसाने गारवा निर्माण केला.




अवकाळी पडलेल्या पावसामुळे इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील आठवडी बाजारात मोठी तारांबळ उडाली. यामुळे येथील वीजपुरवठा काहीकाळ खंडीत करण्यात आला होता.

दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. हवामान विभागाने कोकण, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात उष्णतेसाठी येलो अलर्ट दिला आहे. पुणे, सातारा, सांगली, धाराशिव, लातूर जिल्ह्यांमध्ये 21 एप्रिल पर्यंत वादळी पावसाची शक्यता वर्तविली आहे.



👁️ Post Views : 4,230

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad