Breaking Posts

5/trending/recent

Type Here to Get Search Results !

इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथे चोरी करणारी टोळी भिगवण पोलिसांनी केली गजाआड

प्रतिनिधी, 

भिगवण पोलीस स्टेशन - प्रेस नोट 

भिगवणः इंदापूर तालुक्यातील मौजे निरगुडे येथे २ एप्रिल २०२४ रोजी घरात शिरुन एक तोळे वजनाचे मंगळसूत्र व रेडमी कंपनीचा मोबाईल चोरी झालेल्या घटनेचा छडा लावण्यात भिगवण पोलिसांना यश आले आहे. तसेच या चोरीतील संशयीत आरोपी अनिकेत वनवा शिंदे (रा. बुध ता. खटाव जि. सातारा) याला तांत्रिक विश्लेषनाच्या आधारावरून अटक केली आहे. सदर संशयीत आरोपी अनिकेत शिंदे याच्याकडून चोरीतील रेडमी कंपनीचा मोबाईल फोन जप्त केला आहे. तसेच सदर संशयित आरोपीने या चोरीतील त्याचे साथीदार अनिकेत कव्या पवार आणि झुंझार कव्या पवार (रा. खताळपट्टा, ता. बारामती जि. पुणे) असल्याचे कबुल जबाबात म्हटले आहे.

आरोपी अनिकेत शिंदेला वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाईसाठी भिगवण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या चोरीतील आरोपींवर भिगवण पोलीस स्टेशन येथे गु.र.न. १४६/२०२४ भादवि कलम ३९२,३८०,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिगवण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक ०२/०४/२०२४ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मौजे निरगुडे ता इंदापूर येथील योगेश मारुती केकान यांचे रहाते घरात शिरुन फिर्यादी यांची आत्या रुक्मिणी केकाण याचे गळ्यातील १ तोळे वजनाचे मंगळसूत्र व रेडमी कम्पनीचा मोबाईल जबरीने चोरी करून घेऊन गेले होते. सदर बाबत भिगवण पोलीस स्टेशन येथे गु र न १४६/२०२४ भा द वि कलम ३९२,३८०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हाचा समांतर तपास पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा संमांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणणे कामी सुचना केल्या होत्या. 

त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, सहाय्यक फौजदार कारंडे, पोलीस हवालदार / १८५२ एकशिंगे, पोलीस हवालदार / २०५७ आहिवळे, पोलीस हवालदार मोमीण, पोलीस हवालदार डेरे, पोलीस नाईक शिंदे असे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषना वरून सदरचा गुन्हा हा आरोपी नामे अनिकेत वनवा शिंदे (रा. बुध ता. खटाव जि सातारा) याने केला असल्याचे निष्पन्न झाले. वरील पोलीस स्टाफने आरोपीस त्याच्या राहत्या घरा जवळून सापळा लावुन त्यास सदर ठिकाणी ताब्यात घेवून त्याच्याकडे सदर गुन्हयाचे अनुषगाने तपास केला. तपासात आरोपीने सदर गुन्हा हा त्याचे साथिदार नामे अनिकेत कव्या पवार व दोन्ही (रा. खताळपट्टा ता. बारामती जि.पुणे) यांचे सोबत केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी यांची दोन पंचा समक्ष अंग झडती घेतली

असता त्याचे शर्टचे खिशात गुन्हयातील चोरी केलेला गुलाबी रंगाचा रेडमी के २० कंपनीचा मोबाईल मिळून आला तो गुन्हया चे पुराव्याकामी जागीच जप्त करण्यात आला आहे. सदरचा आरोपी हा सातारा जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्येवर वाठार पोलीस स्टेशन व पुसेगाव पोलीस स्टेशन येथे दरोडा व जबरी चोरीचे २ गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी मा पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव (बारामती), उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड (बारामती उप विभाग), पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली स. पो नि योगेश लंगुटे, स. पो. नि. कुलदीप संकपाळ, स. फो. बाळासाहेब कारंडे, पो. हवा. स्वप्नील अहिवळे , पो. हवा. राजू मोमीन, पो. ना. अतुल डेरे, पो. ना. निलेश शिंदे यांनी केली. सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी भिगवण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.


👁️ Post Views : 5,120


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad