Breaking Posts

5/trending/recent

Type Here to Get Search Results !

ग्रामीण भागातील नागरिकांना अल्प खर्चात लहान मुलांची उत्तम आरोग्य सेवा देणारा अवलिया ; डॉक्टर संजय सपकाळ



प्रतिनिधी,

वालचंदनगर :- अनेक वेळा खासगी रुग्णालये रुग्णांची लूट करीत असल्याच्या बातम्या समोर येत असतात. परंतु, इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील कुरवली या गावात एक डॉक्टर या महागाईच्या काळातही लहान मुलांवर अगदी कमी खर्चात उपचार करीत आहे.घरात लहान मुल आजारी पडले की इंदापूर तालुक्यासह इतर भागातील बहुसंख्य पालकांच्या तोंडी वालचंदनगर - बारामती रोड वरील कुरवली येथील श्री गणेश हॉस्पिटलचे डॉक्टर संजय सपकाळ यांचच नाव घेण्यात येत असल्याच चित्र आहे.अनेक कुटूंब आपल्या आजारी पाल्याला उपचारासाठी या डॉक्टरांकडे घेऊन जाताना दिसतात.अगदी कमी खर्चात लहान मुले आजारपणातून ठणठणीत ठीक होत आहेत.पंचक्रोशीत अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे तसेच सामाजिक बांधिलकी जपत पूर्णपणे समर्पण देऊन काम करणारे म्हणून येथील डॉ. संजय सपकाळ यांची ओळख आहे.वेळेत औषध उपचार करून रुग्णाला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी रुग्णाची कुटुंबासारखी काळजी घेतली जाते. 

आजच्या काळात लोकांचा डॉक्टरांवरचा विश्वास कमी झालेला असून,डॉक्टर पेशंटपासून मनाने अलिप्त होत आहेत. बदललेली परिस्थिती डॉक्टर-पेशंट नात्याचे चक्रही फिरवते आहे.गोरगरीब जनतेला योग्य उपचार न देता फक्त व्यवसाय म्हणून अनेक हॉस्पिटल कडून लूट सुरू आहे. आपत्कालीन परिस्थितीत जनतेला चांगले उपचार देऊन आधार देण्याऐवजी जास्तीचे बिले आकारून त्यांची लूटमार केली जाते.

डॉक्टर.. खर्‍या अर्थाने देवदूत... आपल्या शरीराच, मनाच. दुखणं हमखास बरा करणारा तज्ञ... ‘डॉक्टर’ म्हणजे दिलासा... मनाला उभारी, जीवनाची नवी उमेद. असह्य वेदनेतून हमखास सुटका करणारा अवलिया अशी डॉक्टरांची सर्वसामान्यांच्या मनातून ओळख पुसट होत असताना सध्याच्या काळात बोटावर मोजण्या इ तके डॉक्टर कमी खर्चात रुग्णसेवा प्रदान करताना दिसून येतात यात इंदापूर तालुक्यातील कुरवलीच्या डॉ. संजय सपकाळ यांच नाव आपसूकच येतं.


👁️ Post Views : 8,150

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad