Breaking Posts

5/trending/recent

Type Here to Get Search Results !

वालचंदनगर कंपनीचा चांद्रयान 3 मोहिमेत सहभाग ; अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी केला जल्लोष साजरा


प्रतिनिधी


वालचंदनगर :- वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील कंपनीचा चांद्रयान-3 मोहिमेमध्ये मोलाचा सहभाग असून,चांद्रयानाच्या यशामुळे इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर कंपनीच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याची माहिती वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी यांनी दिली.

चांद्रयान मोहिमेच्या यानाच्या उड्डानासाठी वापरण्यात आलेल्या सहा बुस्टर मोटर्सपैकी चार बुस्टर मोटर्सची (एस-200) निर्मिती वालचंदनगर कंपनीने केली होती. यामध्ये हेड एन्ड सेगमेंट, मिडल सेगमेंट, नोझल एन्ड सेगमेंट तसेच प्लेक्स नोझल कंट्रोल टॅक या महत्वाच्या उपकरणाचा समावेश आहे.ही सर्व उपकरणे उड्डानाच्या पहिल्या स्टेज साठी वापरण्यात आली. 14 जुलै रोजी यानाने उड्डान केले होते. आज चंद्राच्या पृष्ठभागावर रोवरचे यशस्वी लॅडिंग झाले आहे. वालचंदनगर कंपनीतील अधिकारी,कर्मचारी यांनी भारताच्या यशाचा जल्लोष केला.

वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी यांनी कंपनीतील अधिकारी यांच्यासोबत सुर्वण क्षणाचा आनंद घेवून साक्षीदार झाले. चिराग दोशी व कंपनीचे युनिट हेड धीरज केसकर यांनी कंपनीत सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगारांचे अभिनंदन केले.चांद्रयान - 1 व चांद्रयान - 2 मोहिमेमध्ये ही वालचंदनगर कंपनीचा मोलाचा वाटा होता. तसेच मंगळयान मोहिमेमध्ये वालचंदनगर कंपनीचे योगदान होते. गेल्या पाच दशाकापासुन वालचंदनगर कंपनी एरोस्पेस क्षेत्राशी संलग्न काम करीत असून, अनेक महत्वाची उपकरणे तयार करीत असून भारताच्या महत्वकांक्षी गगनयान मोहिमेसाठी महत्वाची उपकरणे बनविण्याचे काम वालचंदनगर मध्ये सुरु आहे. यातील काही उपकरणे कंपनीने तयार करुन इस्त्रोकडे हस्तांतर केली आहेत.तसेच अनेक उपकरणे बनविण्याचे ही काम सुरु आहे.चांद्रयान -3 मोहिम यशस्वी झाल्याचा अभिमान आहे. या मोहिमेमुळे जगामध्ये भारताचे नाव झळकले. आजच्या एका सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य वालचंदनगर व इंदापूर तालुक्याला लाभले. इस्त्रोच्या महत्वकांक्षी गगनयान मोहिमेसाठीची उपकरणे बनविण्याचे काम वेगाने सुरु असून, येणाऱ्या काळामध्ये गगनयान मोहिम ही यशस्वी होईल असे वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी यांनी सांगितले.




👁️ Post Views : 4,950

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad