Breaking Posts

5/trending/recent

Type Here to Get Search Results !

भिगवण नजिक मदनवाडी येथील अवैध वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या हॉटेलवर भिगवण पोलीसांचा छापा ; हाॅटेल मालकासह 5 जणांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी,

भिगवण :- इंदापूर तालुक्यातील भिगवण नजिक मदनवाडी ता.इंदापूर येथील हद्दीतील आनंद हाॅटेलवर रात्रीच्या वेळी भिगवण पोलीस पथकाने छापा टाकुन 3 महीलांसह संबधीत हाॅटेल मालक व त्यांचे 4 साथीदार यांना ताब्यात घेतले.यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिगवणनजिक बारामती रस्त्यावर हॉटेल आनंद येथे बेकायदा वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती पुण्यातील परीविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षकांना व भिगवण पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला, तेव्हा तेथे तीन महिला आढळून आल्या.यात पाच जणांनी आमच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती दिली.

हाॅटेल मालकासह त्याचे साथीदार यांचेवर महिला व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केल्याची माहिती भिगवण पोलीसांनी दिली.

नामदेव बाळासो बंडगर (वय 40 वर्षे, रा. मदनवाडी, ता. इंदापुर, जि.पुणे) व त्याचे साथीदार अमित तानाजी भोकरे, (वय.21 वर्ष, रा. मदनवाडी, ता. इंदापुर, जि. पुणे) रोहीत अंकुश निकम, (वय 25 वर्ष, रा. उध्दट, ता. इंदापुर, जि.पुणे) गजानन लक्ष्मण ठाकुर (सध्या रा. आनंद हॉटेल, भिगवण,ता.इंदापुर,जि.पुणे, मुळ रा. गंगाखेड, जि परभणी ), मुंगाजी उर्फ पिंटु आवरगड,(रा.भिगवण,ता.इंदापुर, जि. पुणे मुळ रा.रूमणा जवळा,ता.गंगाखेड,जि.परभणी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असुन त्यातील तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे तर 2 आरोपी फरार आहेत.सदर अटक आरोपींना इंदापूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 12 तारखेपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सदरची कारवाई ही पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देखमुख,बारामती उपविभागीय पोलीस अधीकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरीक्षक संदेश बावकर,रूपेश कदम,युवराज घोडके, दत्तु जाधव, रणजीत मुळीक,अंकुश माने,आप्पा दराडे,नारायण वाळके,डी.एल.इंगोले,डी.एस.जाधव, महीला पोलीस अंमलदार सारीका जाधव यांचे पथकाने केली असुन पुढील तपास सहा.पोलीस निरिक्षक संदेश बावकर हे करत आहेत.


👁️ Post Views : 8,580

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad