Breaking Posts

5/trending/recent

Type Here to Get Search Results !

पाटीलवस्ती लासुर्णे येथील शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी,

लासुर्णे :- जि प शाळा पाटीलवस्ती(लासुर्णे) ता. इंदापूर जि. पुणे येथे सन 2024- 25 या शैक्षणिक वर्षात दाखल होणाऱ्या इयत्ता पहिली मधील विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्व तयारी मेळावा मोठ्या उत्साहात गुरुवार दिनांक १८-४-२०२४ रोजी पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांना शारीरिक विकास , सामाजिक बौद्धिक विकास, भाषिक विकास, गणन पूर्वतयारी, स्वागत व नाव नोंदणी ,समुपदेशन व सेल्फी पॉईंट इत्यादी टेबल रचना उत्कृष्ट रित्या करण्यात आली होती. सुरुवातीला विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांच्यावर फुले उधळीत हलगीच्या स्वरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सात टेबलवर जाऊन विद्यार्थी वेगवेगळ्या कृती करून आनंददायी पद्धतीने या उपक्रमात सहभागी झाले. या उपक्रमासाठी शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक दिलीपराव काळे, शिक्षिका मंदाकिनी लोंढे, गीतांजली लाड ,अर्चना कुंभार, पल्लवी गवळी, मनीषा लोंढे अंगणवाडीच्या राजश्री सुतार ,शोभाताई लोंढे, उल्काताई लोंढे, शीतल लोंढे, बेबीताई लोंढे व वर्षाताई ठोंबरे या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले .यावेळी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

सर्वांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला

पाटीलवस्ती ( लासुर्णे) शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. शाळेतील दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे या शाळेत इंग्रजी तसेच खाजगी शाळेतील अनेक विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. तसेच दूरवरून या शाळेत विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत. शाळेतील प्रसन्न, स्वच्छ सुंदर वातावरण व शिक्षकांचे वैयक्तिक मार्गदर्शन यामुळे येथील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करत आहेत.



👁️  Post Views : 1,340

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad