Breaking Posts

5/trending/recent

Type Here to Get Search Results !

इंदापूरात दिवसाढवळ्या वयोवृद्ध आजीला मारहाण करत गळ्यातील सोन्याचे दागिने लुटले




प्रतिनिधी


इंदापूर :- दिवसाढवळ्या इंदापूर शहरामध्ये एका वयोवृद्ध आजीला गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांसाठी एकाने दुचाकीवर घरी सोडण्याचा बहाणा करत अज्ञात स्थळी नेऊन वृद्ध आजीला मारहाण करीत लुटल्याची घटना घडली आहे.




याप्रकरणी अधिक माहिती अशी की आज गुरुवार दि. (27 जुलै ) रोजी भर दुपारी बिजवडी ग्रामपंचायत हद्दीतील वनगळी गावच्या रहिवाशी असलेल्या रुक्मिणी पांडुरंग करगळ (वय-80 वर्षे) या सकाळी गावावरून इंदापूर शहरात औषधे खरेदीसाठी आल्या होत्या.औषधं खरेदी करून दुपारी घरी जात असताना इंदापूर शहरातील बाब्रस पेट्रोल पंपाच्या लगत पाठीमागून लूना गाडीवर हेल्मेट परिधान करून आलेल्या व्यक्तीने पुढे सोडतो म्हणून आजीला गाडीवर बसवले. त्यानंतर त्याने पंपावर पेट्रोलही टाकले. व पुढे बाह्यवळण मार्गाने सरडे टोल नाक्याच्या दिशेने अज्ञातस्थळी नेत बेदम मारहाण करीत गळ्यातील व दोन्ही कानातील दागिने हिसका देऊन ओरबाडून काढले. यामध्ये आजीच्या कानाला व गळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.तसेच चोरट्याने आजीला मारहाणही केली असल्याचे या वृद्ध आजीने संगितले. यामुळे आजीचा कान,हात,पाय, गळा यांना गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून,याबाबत इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.





👁️ Post Views : 2,030

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad