Breaking Posts

5/trending/recent

Type Here to Get Search Results !

भवानीनगर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा बॅनरला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

 

प्रतिनिधी,

भवानीनगर :- भवानीनगर ता. इंदापूर येथील साखर कारखान्याच्या समोरील परिसरात एका व्यक्तीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरला एका बाजूला पेटवण्याचा प्रयत्न केला आणि हातात शस्त्र घेऊन जातीवाचक शिवीगाळ केली. अश्या त्या नशेडी आरोपी वृध्दाच्या विरोधात वालचंदनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी वस्तुनिष्ठ गुन्हा दाखल करण्यात आला.महामानव परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाजातील चैतन्यमय वातावरणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला.

बारामतीचे सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहीते मौर्य तसेच ऍड विजय गव्हाळे, वंचितचे मंगलदास निकाळजे, तसेच बारामती, भवानीनगर, लासुर्णेसह इतर गावातील आणि समाजातील सर्व कार्यकर्ते आणि पुढाऱ्यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्याला जाऊन कायदेशीर गुन्हा दाखल करण्यासाठी पुढाकर घेतला.

सदर इसमावर गुन्हा दाखल झाला आहे. जयंतीचे पवित्र आणि चैतन्यमय वातावरण पाहता समाजाला शांततेचे आव्हान सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

सदर आरोपीस अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी सांगितले.या मागील समाज कंटाकांचा शोध चालू आहे.

याबाबत बारामतीचे Dysp राठोड यांनी कार्यतत्परता दाखवली असून, सर्व भिम अनुयायांनी भिम जयंती कडे लक्ष द्यावे कायदा हातात घेऊन काही चुकीची पाऊले उचलू नयेत असे आवाहन देखील सर्वांना पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



👁️ Post Views : 7,420

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad