Breaking Posts

5/trending/recent

Type Here to Get Search Results !

पुण्यात हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या कष्टकरी व शेतकऱ्यांच्या लेकरांवर पैसे नसल्याने बिस्किटं खाऊन झोपायची वेळ

 

प्रतिनिधी,

पुणे :- महाराष्ट्रात गत वर्षी अतिशय कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची भयावह स्थिती आहे. अनेक भागातून शिक्षणासाठी पुणे येथे आलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांना अक्षरशः एक वेळचे जेवणही मिळणे कठीण होत आहे.

महाराष्ट्रात एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत पुण्यात शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. गावाकडची हालाखीची परिस्थिती त्यामुळे पुण्यातील अनेक विद्यार्थी असे आहेत तिथे सध्या एक वेळ जेवण करून आपलं शिक्षण पूर्ण करत आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुण्यातील हेल्पिंग हॅन्ड संस्थेने पुढाकार घेतला आहे. या संस्थेचे प्रमुख ऍड कुलदीप आंबेकर आणि संस्थेतील मुलांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांच्या बोलण्यातून अनेक काळीज हेलावून टाकणाऱ्या कहाण्या समोर आल्या आहेत.अनेक विद्यार्थ्यांना पैसे नसल्याने बिस्किटं खाऊन झोपायची वेळ आली आहे.

पुण्यात फिजिक्स विषयाचे मी शिक्षण घेते. माझं पहिलं वर्ष आहे पहिले काही महिने दोन वेळेचं जेवण मला शक्य नव्हते. त्यामुळे मी केवळ संध्याकाळी जेवायचे, अशी व्यथा एका मुलीने सांगितली.

मागील सहा महिन्यांपासून पुण्यात आहे. येताना खिशात थोडेच पैसे होते. काही दिवसांमध्ये ते पैसे संपून गेले. त्यानंतर मात्र मोठी अडचण सुरू झाली अनेक वेळा केवळ बिस्किटं खाऊन संध्याकाळचा झोपलो आहे. गावची परिस्थिती ठीक नसल्यामुळे आई-वडिलांकडून पैसे मागू शकत नाही. त्यामुळे सध्या दिवस ढकलत आहे. विदर्भ मराठवाड्यातून येणारी अनेक मुलं इथं आहेत त्यांची परिस्थिती अतिशय भयावह आहे. त्यांची मदत व्हायला हवी. मोलमजुरी करणारी माझी आई तिला मी पैसे कसे मागू हा माझ्यासमोर प्रश्न आहे, अशी व्यथा आणखी एका विद्यार्थ्याने सांगितली.

मी विदर्भातील रहिवासी असून, सध्या अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे आता वडिलांना मला पैसे पाठवणे शक्य होत नाही सध्या आर्थिक अडचणीचा आम्ही सामना करत आहोत. हेल्पिंग हँड्स या संस्थेच्या निमित्ताने माझी जेवणाची सोय झाली आहे. आम्ही अडचणीत आहोत. समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढं यावं आणि आमच्या सारख्या अनेक विद्यार्थ्याची जी अडचण झाली आहे ती सोडवावी, असे आवाहन या संस्थेतील एका विद्यार्थ्याने केले.



राज्य सरकारची शुल्कमाफीची योजना फसवी, विद्यार्थी लाभापासून वंचित - ऍड. कुलदीप आंबेकर 

सध्या दुष्काळाची तीव्रता खूप आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून अनेक विद्यार्थी पुण्यामध्ये शिकायला येतात. स्टुडन्ट हेल्पिंग हॅन्ड या संस्थेकडे तब्बल अडीच हजार मुलांनी आम्हाला जेवणाची सोय करा, अशी मागणी करणारे फॉर्म दिले आहेत. मधल्या काळात काही संस्थांनी मला मदत केली यामुळे मी आत्तापर्यंत केवळ 500 मुलांची व्यवस्था करू शकलो. जवळपास दोन हजार मुलं अशी आहेत जी केवळ एक वेळ जेवण करत आहेत. अनेक राजकीय व्यक्तींनी आम्हाला मदतीसाठी शब्द दिला. मात्र एकानेही आम्हाला मदत केली नाही. मानवाच्या नैसर्गिक गरजा मधील अन्न वस्त्र निवारा पैकी अन्नाची गरज पूर्ण होत नाही हे आता लक्षात येत आहे. खाणे आणि राहणे या दोन सोयी नसल्यामुळे अनेक मुलं शिक्षण सोडून माघारी गेली आहेत. 

सध्या सरकारने दुष्काळग्रस्त भागातील मुलांना फी माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक विद्यार्थी हा जीआर घेऊन ज्यावेळेस संस्थांकडे जातात. त्यावेळेस संस्था फी माफी द्यायला नकार देतात. त्यांचा असं म्हणणं असतं पहिले तुम्ही पैसे भरा मग आम्ही तुम्हाला फी परतावा देतो. ही माफीची निव्वळ फसवी योजना आहे .शुल्क माफीच्या निर्णयामध्ये जर एखादा विद्यार्थी स्कॉलरशिपचा लाभार्थी असेल तर त्याला हा निर्णय लागू होत नाही. मुळात स्कॉलरशिप या खूप कमी पैशाच्या असतात. अनेक विद्यार्थी केवळ स्कॉलरशिपच्या जीवावरच पुढचं शिक्षण घेत आहेत. अशावेळी त्यांना फी माफी मिळाली नाही तर त्यांच्यासमोर अनेक अडचणी समोर उभ्या राहतात. मुळात स्कॉलरशिपचे पैसे शिक्षण सुरू असताना मिळतच नाहीत, एक-दोन वर्षाने मिळतात अशी परिस्थिती आहे, असे ऍड. कुलदीप आंबेकर यांनी सांगितले.


👁️ Post Views : 1,040


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad