Breaking Posts

5/trending/recent

Type Here to Get Search Results !

इंदापूर तालुका लोक कलावंत महासंघाची स्थापना ; अध्यक्ष पदी नाथा सरतापे यांची निवड

प्रतिनिधी,

वालचंदनगर :- वालचंदनगर येथे पार पडलेल्या नियोजित बैठकीत इंदापूर तालुका लोक कलावंत महासंघाची स्थापना करण्यात आली.रविवार दिनांक ७ एप्रिल रोजी वालचंदनगर येथील डॉ आंबेडकर सभागृह येथे झालेल्या बैठकीत इंदापूर तालुक्यातील सर्व लोककलावंतांची बैठक बाळासाहेब सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सर्व लोक कलावंतांच्या वतीने नवीन संघटनेचा शुभारंभ करण्यात आला. लोक कलावंतांच्या विविध अडचणी आणि त्यावर मात करण्यासाठी एक संघटन असणे गरजेचे असल्याने इंदापूर तालुका लोक कलावंत महासंघ या संघटनेची स्थापना करण्यात आली असल्याचे संस्थापक बाळासाहेब सरवदे यांनी सांगितले.

यावेळी या संघटनेची नूतन कार्यकारिणीची झालेली निवड पुढील प्रमाणे

 अध्यक्ष - नाथा सरतापे

 उपाध्यक्ष - दिलीप भोसले, भिमराव चितारे,सतिश मिसाळ

 कार्याध्यक्ष - कुमार साठे

 खजिनदार - हासीम राजा

 सचिव - राहूल क्षिरसागर

 सह सचिव - महेंद्र शिवशरण

 संघटक - स्वप्नील सरतापे, मोनू ढोबळे, राजु साबळे,जय दोडके

 प्रसिद्धी प्रमुख - अतुल सोनकांबळे, पत्रकार घोडके

 सल्लागार - विजय सरतापे, सुनिल साबळे, नेताजी लोंढे, अमर धेंडे, बापू सरवदे, दिपक गायकवाड, विशाल कांबळे, अनिकेत मिसाळ, सनी सरतापे, सूरज वनसाळे, नाथा गोरे, विशाल गायकवाड, करण ढोबळे, अमित सरतापे, बापू शिंदे व अक्षय सरवदे

वरील कार्यकारिणीचा सत्कार होवून जेष्ठ गायक ' नाथा गोरे यांनी भैरवी सादर करून सदर बैठकीची सांगता करण्यात आली.



👁️  Post Views : 3,320

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad