Breaking Posts

5/trending/recent

Type Here to Get Search Results !

इंदापूर मधील माता भिमाई आश्रम शाळेत पँथर रत्नाकर (तात्या) मखरे यांना अभिवादन




प्रतिनिधी



इंदापूर :- माता रमाई आंबेडकर विद्यार्थी वस्ती गृह ट्रस्टचे तात्कालीन अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष पँथर दिवंगत रत्नाकर मखरे ( तात्या ) यांच्या 72 व्या जयंतीचा कार्यक्रम रविवार (9 जुलै) रोजी भिमाई आश्रम शाळेत पार पडला.


यावेळी बौद्धचार्य बाळासाहेब सरवदे, किशोर धाईंजे, यांच्या हस्ते व ऍड राहुल मखरे आणी त्यांच्या मातोश्री शकुंतला रत्नाकर मखरे,संतोष मखरे, ऍड समीर मखरे आणी कुटुंबियांच्या उपस्थितीत दिवंगत पँथर रत्नाकर मखरे ( तात्या ) यांच्या समाधीस्थळी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून पुष्प अर्पण करत त्यांना अभिवादन केले.


यावेळी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दिवंगत पँथर रत्नाकर मखरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

याठिकाणी बाळासाहेब सरवदे, नानासाहेब चव्हाण, मारुती नाचण, बाबजी भोंग, सागर (बाबा) मिसाळ, साहेबराव पवार, सविता गोफणे, आदींनी तात्यांच्या कार्यावर दृष्टीक्षेप टाकत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.


या कार्यक्रमास महेश लोंढे, अर्जुन चव्हाण, मधुकर जगताप, भास्करराव साळवे, शाहीदभाई शेख, राहुल शिंगाडे, दिपक मगर, गोरख तिकोटे, संजय कांबळे, अश्वजीत कांबळे, युवराज बनकर,संतोष शेंडे, दादासाहेब देवकर, ऍड सूरज मखरे, पत्रकार नीळकंठ मोहिते, अशोक घोडके, दादासाहेब मिसाळ, तसेच महिला व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक ऍड राहुल मखरे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार नानासाहेब सानप यांनी मानले.




👁️ Post Views : 1,130


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad