Breaking Posts

5/trending/recent

Type Here to Get Search Results !

ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी पुणे जिल्हा अध्यक्ष राज कुमार यांच्याकडून लोकसभा निवडणुकीच्या कामाचा घेतला आढावा

प्रतिनिधी,

नागरगाव - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यावर ती लक्ष केंद्रित केलेला असून त्या संदर्भामध्ये पुणे जिल्हा अध्यक्ष राज कुमार यांना फोन वरून आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा तसेच लोकसभा निवडणुकीत संदर्भ मध्ये सखोल चर्चा केली. 

यावेळी जिल्हाध्यक्ष राज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा पूर्व मध्ये आजपर्यंत १५० शाखा उद्घाटन झालेल्या आहेत शिवाय पुणे जिल्हा पूर्व मध्ये बारामती लोकसभा व शिरूर लोकसभा असे दोन लोकसभा मतदारसंघ येतात त्या लोकसभा मतदारसंघाची बूथबांधणी चांगल्या प्रकारे करून झालेली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये बारामती, इंदापूर , दौंड तालुके पुणे जिल्हा पूर्व मध्ये येतात या तालुक्यामधील बारामती तालुकाध्यक्ष रामदास जगताप, बारामती शहराध्यक्ष रियाज खान, इंदापूर तालुकाध्यक्ष मनोज साबळे, इंदापूर शहराध्यक्ष सुभाष खरे सर, दौंड तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे यांनी चांगल्या पद्धतीने बारामती लोकसभा मतदारसंघाची बूथ बांधणी केलेली आहे शिवाय शिरूर लोकसभा मतदारसंघां मध्ये शिरूर, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुके पुणे जिल्हा पूर्व मध्ये येतात या तालुक्यामधील शिरूर तालुका अध्यक्ष जितेंद्र जगताप, खेड तालुका अध्यक्ष महेंद्र नाईकनवरे, आंबेगाव तालुका अध्यक्ष शिवाजी राजगुरू व जुन्नर तालुका अध्यक्ष गणेश वाव्हळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे बूथ बांधणी चांगल्या प्रकारे केली आहे.

त्यावेळेस ॲड बाळासाहेब आंबेडकर म्हणाले आपण केलेल्या कामाचा अभिमान आहे तुमचं अभिनंदन लोकसभेच्या निवडणुकी मध्ये वंचित बहुजन आघाडीला मतदान जास्तीत जास्त झालं पाहिजे आणि जो पक्षाने दिलेला उमेदवार असेल त्याच उमेदवाराचं काम कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी करून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जास्तीतजास्त मतदान झालं पाहिजे..

असा आदेश ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी जिल्हाध्यक्ष राज कुमार यांच्यासोबत पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारांना दिला.



👁️ Post Views : 1,040

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad